रोहित पवारांचा हा आटापिटा सुरु

0

नागपूर -कर्जत जामखेड एमआयडीसीत उद्योजक नीरव मोदीची जागा घेण्यासाठी आ रोहित पवारांचा  ROHIT PAWAR

हा आटापिटा सुरु आहे. रोहित पवार नीरव मोदीसाठी लढतायत मी कर्जत जामखेडच्या युवकांसांठी लढतोय.मी दिलेल्या कागदपत्राच्या आधारे उद्योग विभागासाठी नीरव मोदीची जमीन एमआयडीसीसाठी घेता येणार नाही, असे उद्योग मंत्र्यांनी जाहिर केले.
१५ दिवसांत एमआयडीसीसाठीचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे उदय सामंतांनी निर्देश दिलेत अशी माहिती भाजप आमदार राम शिंदे यांनी दिली. अशी संघर्ष यात्रा असते का, स्वतःवर फुलांचा वर्षांव करून घेणे, तलावात उड्या मारणे, असा संघर्ष नसतो.रोहित पवार यांनी त्यांच्या जीवनात कधीच संघर्ष पाहिलेला नाही आणि त्यामुळे अशा पद्धतीचं ते वक्तव्य करतात. राजकारणामध्ये आता आमदार झालोय मंत्री झालो तर माझा नातू नक्की कारखानेच कारखाने काढेल
असे प्रत्युत्तर राम शिंदे यांनी दिले.|