ईडीच्या आरोपपत्रात रॉबर्ट वाड्रांचे नाव

0

नवी दिल्ली  NEW DELHI -आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव अंमलबजावणी संचलनालयाने (ED) आरोपपत्रात समाविष्ट केले आहे. शस्त्रास्त्र घोटाळाप्रकरणी आरोपी असणाऱ्या संजय भंडारीशी निगडित लंडनमधील एका मालमत्तेचं रॉबर्ट वाड्रांनी नुतनीकरण करून तिथे वास्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील त्यांच्या संशयित सहभागाची ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. विश्वसनीय माहितीनुसार, ईडीने यूएईस्थित अनिवासी भारतीय चेरूवथूर चेकुट्टी थम्पी व ब्रिटिश रहिवासी सुमित चढ्ढा यांच्याविरोधात पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. राऊस अव्हेन्यू न्यायालयाने हे आरोपपत्र दाखल करून घेतले आहे. ईडीनं यासंदर्भात प्राप्तीकर विभागाकडून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीच्या आधारे चौकशी सुरू केली होती.