सात दिवसांत सुरू होणार पोलिस लाईन टाकळीतील रस्त्यांची डागडुजी

0

डॉ. वैशाली चोपडे यांनी दिलेल्या निवेदनानंतर कार्यकारी अभियंत्यांचे आश्वासन

नागपूर : अत्यंत वाईट अवस्था असलेल्या पोलिस लाईन टाकळी येथील अंतर्गत रस्त्यांची डागडुजी पुढील सात दिवसांत सुरू होईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत राऊळकर यांनी दिले. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे यांच्या नेतृत्वातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने यासंदर्भात दिलेल्या निवेदन दिले. याप्रसंगी ते बोलत होते.

पोलिस लाईन टाकळीमधील अंतर्गत रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. यावर्षी झालेल्या मुसळधार पावसाने त्यात अधिक भर टाकली. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि वाहनचालकांना दररोज मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. वैशाली चोपडे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय गाठले. तेथे कार्यकारी अभियंत्यांची भेट घेत तातडीने रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती करण्याची मागणी केली. यासंदर्भात एक निवेदनही सादर केले. यावर कार्यकारी अभियंत्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. पुढील सात दिवसांत रस्ता डागडुजी व दुरुस्तीची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामाला सुरुवात केले जाईल, हसे आश्वासन दिले.

यावेळी डॉ. वैशाली चोपडे यांच्यासह पोलिस लाईन टाकळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.