

(NAGPUR)नागपूर -शहर सौंदर्यीकरण आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीकोनातून नागपूर महानगरपालिका द्वारा दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येते असून पहिल्यांदाच जानेवारी महिन्यापासून अभियानाला सुरुवात होत आहे. १ जानेवारी २०२४ रोजी धरमपेठ झोन अंतर्गत येणाऱ्या अंबाझरी ते पंचशील चौक येथील नागनदीच्या स्वच्छतेपासून अभियानाच्या प्रथम टप्याला सुरुवात होणार आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात १ जानेवारीपासून मनपाकडे उपलब्ध असणाऱ्या मशिनच्या सहाय्याने नाग नदी, पिवळी नदी व पोहरा नदीची स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती (Municipal Chief Engineer Rajeev Gaikwad)मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी दिली.
शहरात तीन नद्या आहेत. नागनदीची लांबी १७.४ किमी, पिवळी नदीची १६.४ किमी, पोहरा नदीची लांबी १३.१२ किमी इतकी आहे. या नदींच्या स्वच्छता संदर्भात मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांनी बैठक घेतली. याप्रसंगी (Superintending Engineer Manoj Talewar)अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांचासह दहाही झोनचे कार्यकारी अभियंता प्रामुख्याने उपस्थित होते.
बैठकीत गत २३ सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाला.
ज्यामुळे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होत. तसेच जनतेची गैरसोय व नुकसान झाले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता घेत १ जानेवारी पासूनच नदी पात्रातील गाळ काढण्याचे नियोजन करण्यात आले. तसेच बैठकीत नदींच्या पात्रातील जमा गाळ काढून विल्हेवाट करण्याकरिता नियोजना संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावर्षी या ४६.९२ किलोमीटर नदीच्या लांबी मधील चिखल, माती व कचरा काढून डेब्रिज भांडेवाडी व इतर खोलगट जागेत भरून विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सर्व नदींच्या पात्रामध्ये जमा झालेला गाळ काढण्याकरिता नियोजन करून वेळापत्रक तयार करण्यास संबंधित झोनचे कार्यकारी अभियंता यांना निर्देश देण्यात आले आहेत.