रिना सिन्हा यांनी स्वीकारली वेद अध्यक्षपदाची सूत्रे

0

नागपूर (Nagpur):विदर्भ आर्थिक विकास परिषदेची (VED) वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. प्रथमच महिला अध्यक्षाची निवड झाली असून हा मान 22 वर्षे वेद आणि इतर संस्थांमध्ये कार्यरत रिना सिन्हा यांना हा बहुमान मिळाला. माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी रिना सिन्हा आणि शिवकुमार राव यांना पदभार सोपविला. याविषयीची माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली. रिना सिन्हा यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची, समितीची नावे जाहीर केली. यात देवेंद्र पारेख -माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष – पंकज महाजन, बीके शुक्ला आणि राहुल उपगनलावार, अमित पारेख – महासचिव, वरुण विजयवर्गी – खजिनदार, जे.टी. सचिव – दिनेश नायडू, आशिष शर्मा आणि अमित येनूरकर.

कार्यकारिणी सदस्यांच्या नव्या टीममध्ये अमित पारेख, अमित येनूरकर, आशिष शर्मा, अतुल ताजपुरिया, भूपेश शुक्ला, देवेंद्र पारेख, दिनेश नायडू, गोविंद डागा, जागोबा साळवे, नवीन मालेवार, नवीन मिथल, नारायण गुप्ता, निधी गांधी, पंकज महाजन, राहुल उपगनलावार, शिवकुमार राव, वरुण विजयवर्गी, विकास जैन, प्रमोद बत्रा, डॉ प्रीती पेंढारकर, डॉ टी एस रावल. निधी गांधी आणि विकास जैन या नवीन सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला.11 नवीन सदस्यांचा समावेश करण्यात आला यात कु. हेतल संपत, डॉ. रिटा धोडपकर, सीए संजय अग्रवाल, सीए राजेंद्र सिंग, मनीष औरंगाबादकर, तविंदर रावल, सीए राजीव चंद, मोहम्मद. मास्टर, आणि अभय देशपांडे, निधी गांधी आणि विकास जैन यांचा समावेश आहे. बॉक्ससाठी….. पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्ससाठी करणार पाठपुरावा वेदच्या वतीने नागपुरात धान संशोधन संस्थेसाठी प्रयत्न केले जाणार आहेत.तूर्त याचा अभ्यास सुरू असून अजनी येथून मोठ्या प्रमाणात निर्यात होते हे लक्षात घेता नव संशोधकांनी देखील यात पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

यासोबतच विदर्भ सक्षम व्हावा या दृष्टीने संकल्पबद्ध असलेल्या वेदने जुन्या अनेक गोष्टींचा फॉलोअप करण्याचे ठरविले आहे यावर रीना सिन्हा यांनी भर दिला. यात माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख यांनी सांगितले की, पोर्ट नसल्याने रिफायनरी विदर्भात होऊ शकत नसली तरी पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व्हावा, या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरू आहे. सप्टेंबर महिन्यात एक अहवाल या संदर्भात आलेला असून तो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. आठ पर्याय यात देण्यात आले असून आचारसंहिता संपल्यानंतर साधारणतः नवे सरकार आल्यावर या संदर्भामध्ये केंद्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न केले जातील. या माध्यमातून रोजगार निर्मिती पण होऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. मिहान, एसईझेड सिंदी ड्रायपोर्ट यासोबतच पर्यटन वाढीच्या दृष्टीने विविध उपक्रमाबाबत येत्या काळात काम केले जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष रीना सिन्हा यांनी दिली. यावेळी माजी अध्यक्ष देवेंद्र पारेख, अमित पारेख, राहुल उपगनलावार, पंकज महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.