पुण्यात पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

0

पुणे(Pune), 13 मे लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा आज महाराष्ट्रासह देशभरात पार पडत आहे. त्या टप्प्यात १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९६ जागांसाठी आज मतदान होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील ११ जागांचाही समावेश आहे.पुणे लोकसभा मतदारसंघासाठीही मतदानाला सुरुवात झाली आहे.

महाविकास आघाडीचे पुण्यातले उमेदवार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar) यांनी मतदान केलं. कमला नेहरू विद्यालय शाळेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मतदान केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्रातील सर्वाधिक सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 2014 च्या लोकसभा निवडणुका वगळता नेहमीच 50 टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले आहे. मात्र यावेळी सकाळपासूनच विविध मतदान केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे.

आज महाराष्ट्रातील पुणे, शिरूर, मावळ, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर आणि जालना मतदारसंघांमधील मतदार त्यांचा हक्क बजावतील. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात २९८ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.