
नागपूर -दिल्लीत विरोधक मोर्चा काढत आहेत, कारण त्यांचे खासदार निलंबित केले गेले. लोकशाहीत मोर्चा काढण्याचा विरोधकांना अधिकार आहे मात्र, याला खरेतर विरोधकच जबाबदार होते असा आरोप रिपा नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला. आठवले म्हणाले, सभागृह सार्वभौम असून हाऊस चालवणे लोकशाहीत सगळ्या पक्षाची जबाबदारी असते. संसदेत जे काही घडलं, त्या तरुणांनी उडी मारली ही गोष्ट चांगली नाही. सरकारने आणि विरोधकांनी यावर प्रश्न उपस्थित केला होता. यावर चर्चा होण्याची गरज होती. चर्चा व्हायलाच हवी होती, पण त्यांनी ती चर्चा केली नाही. लोकशाहीत विरोधकांना मोर्चा काढण्याचा अधिकार आहे.
दरम्यान, निलंबित खासदारांनी उपराष्ट्रपती यांची नक्कल केली. उपराष्ट्रपतींची नक्कल करणे ही चांगली गोष्ट नाही आहे. त्यांनी उपराष्ट्रपतींची माफी मागितली पाहिजे असेही रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.