भारतातील श्रीमंत जिल्हे : टाॅप २५ मध्ये ‘या’ जिल्ह्याचा समावेश

0
भारताच्या आर्थिक स्थैर्यामध्ये ज्याप्रमाणे विविध राज्यं योगदान देत आहेत, त्यात काही जिल्ह्यांचा प्रामुख्याने समावेश होतो. नव्याने घोषित अशा जिल्ह्यांच्या यादीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांची नोंद झाली असून, यात नागपूरचा देखील अंतर्भाव आहे.
परिणामी, महाराष्ट्रातील नागपूर हा देशातील टॉप २५ श्रीमंत जिल्ह्यांमध्ये समाविष्ट झाला आहे. 25 श्रीमंत जिल्ह्यांमध्ये नागपूरचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच इकॉनॉमिक्स सर्वेच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आला. तशी पोस्ट सध्या समाज माध्यमावर वायरल होत आहे.

मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. त्यामुळे मुंबई श्रीमंत यादीत आहेत. मात्र महाराष्ट्र राज्यातील आणखी तीन शहरे देखील श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीत आहेत त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, पुणे, नागपूर यांचा समावेश आहे. नागपूर हे महाराष्ट्र राज्याच्या उपराजधानीचे शहर आहे. 

नागपूर (Nagpur) जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने संत्रा लागवड आणि शेती शिवाय उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. संत्र्यांच्या मोठ्या प्रमाणातील उत्पादनामुळे नागपूरला संत्रा नगरी देखील म्हटले जाते. नागपूरचा विकास दिवसेंदिवस भरभराटी जात आहे. त्यामध्ये नागपूर मेट्रो सारखे दळणवळणाचे साधन आता उपलब्ध झाले आहे. नागपुरातून विमान वाहतूक, रेल्वे वाहतूक आणि इतर साधनांचा देखील इथे उपलब्धता आहे. 
इतकेच नव्हे तर मुंबईला अत्यंत कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी समृद्धी महामार्ग देखील जोडण्यात आला आहे. भारताचे टायगर कॅपिटल म्हणून ही नागपूरकडे पाहिले जाते. या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्येही नागपूरचे खूप मोठे योगदान आहे.