
व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून साधला कार्यकर्त्यांसोबत संवाद
चंद्रपूर : जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. यावेळी पावडे कुटुंबीयांनी मंत्री बावनकुळे यांचे स्वागत केले. तसेच प्रभागातील नागरिकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात मंत्री महोदयाचे स्वागत करण्यात आले होते.आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून साधला कार्यकर्त्यांसोबत संवाद त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे*स्वतः भाजपचे माजी महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर अत्यंत अल्पावधीत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी आपल्या सहकारी कार्यकर्त्यांसह स्वागताची जय्यत तयारी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अल्पकाळात केलेल्या जंगी स्वागताने चांगलेच भारावून गेले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकार समाजातील सर्व घटकांसाठी विशेष योजना राबवित आहेत. या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचल्या पाहिजे. जनतेच्या मनात केंद्र, राज्य शासनाविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी केंद्र, राज्य शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
यावेळी राहुल पावडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगीनाबाग प्रभागातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.