या खेळाडूची आयपीएलमधून निवृत्ती

0

 

नवी दिल्ली (New Dellhi), 23 मे : क्रिकेटपटू दिनेश कार्तिकने (Cricketer Dinesh Karthik) आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून 2008 मध्ये आपली आयपीएल कारकीर्द सुरू केली होती. आपल्या आयपीएल कारकिर्दीत त्याने 257 सामने खेळले असून 4842 धावा केल्या आहेत. त्यात दिनेश कार्तिकने 22 अर्धशतकी खेळी केल्या. आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त धावा करणाऱ्या टॉप 10 फलंदाजांमध्ये दिनेश कार्तिकचा समावेश आहे.

दिनेश कार्तिक आयपीएलमध्ये 6 संघांकडून खेळला. दिल्ली डेअरडेविल्स, किंग्ज इलेव्हन पंजाब, मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्यात या संघांचा समावेश आहे.दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 17 वर्ष योगदान दिले. राजस्थान विरुद्धची मॅच संपल्यानंतर आरसीबीच्या खेळाडूंनी दिनेश कार्तिकला गार्ड ऑफ ऑनर दिला. त्याचा हा आयपीएलचा प्रवास अखेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संपला.