

हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज
नवी दिल्ली (Nagpur) : यावर्षी मान्सूनचा वेग चांगला असून नियोजित वेळेपेक्षा 3 दिवस आधीच हजेरी लावणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) दिली. मान्सून साधारणपणे 22 मे च्या सुमारास अंदमान आणि निकोबार बेटांच्या किनारपट्टीवर पोहोचतो. परंतु, यावेळी ते 19 मे पर्यंत 3 दिवस आधीच पोहचणार आहे.
मे महिन्याची १५ तारीख संपल्यानंतर सर्वांना मान्सूनबाबत उत्सुकता लागलेली असते. मागील वर्षी पाऊस कमी प्रमाणात झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. काही दिवसापूर्वी हवामान विभागाने मान्सूनबाबत अपडेट दिली होती. या वर्षी मान्सूनची सुरूवात लवकर होऊ शकते. हवामान विभागाने तारीखही जाहीर केली आहे. केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारतात १६ मे आणि १८ मे पासून पूर्व भारतात उष्णतेची लाटेचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
केरळमध्ये ३१ मे च्या सुमारास मान्सून येणार
देशाच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली असली तरी अजूनही सर्वत्र उकाडा जाणवतोय. त्यामुळे देशात नैऋत्य मान्सूनची मोठ्या उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार मान्सून 19 मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर आणि दुसऱ्या दिवशी दक्षिण अंदमान समुद्र आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार अल निनो प्रणाली कमकुवत होत आहे. अल निनो परिस्थिती सुधारली आहे. आगामी काळात यात आणखी सुधारणा होण्याची शक्यता आहे.
अल निनो सोबत हिंद महासागर द्विध्रुव (आयओडी) परिस्थिती देखील 2024 पर्यंत या वर्षी चांगल्या मान्सूनसाठी अनुकूल दिसते. ही सर्व चिन्हे चांगल्या मान्सूनकडे बोट दाखवत आहेत. यंदा सरासरीपेक्षा चांगला पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तवली आहे. मात्र, एप्रिलच्या सुरुवातीलाच हवामान खात्याने यंदा सामान्य पाऊस होईल, असे सांगितले होते. मात्र परिस्थिती सुधारल्यानंतर मे महिन्यात सामान्यपेक्षा चांगला पाऊस पडेल, असा अंदाज आहे.नैऋत्य मान्सून 19 मे पर्यंत अंदमान आणि निकोबार बेटांवर पोहोचण्याची शक्यता आहे. यानंतर 29 मे ते 1 जून दरम्यान केरळला धडकू शकते. साधारणपणे 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो. यंदा वेळेवर येण्याची अपेक्षा आहे. मान्सून 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होऊ शकतो. तसेच, 20 जूनपर्यंत ते गुजरात आणि मध्य प्रदेशच्या अंतर्गत भागात हजेरी लावण्याची शक्यता आहे.
आगामी 19 मे रोजी अंदमानमध्ये दाखल होणार
आगामी 20 ते 25 जून दरम्यान मान्सून उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंड आणि काश्मीरमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मान्सून 30 जून रोजी राजस्थान, दिल्ली, हरियाणा आणि पंजाबमध्ये धडकू शकतो आणि पुढे सरकत 8 जुलैपर्यंत संपूर्ण देश व्यापेल. तसेच, अद्याप या राज्यांसाठी मान्सूनच्या आगमनाची कोणतीही निश्चित तारीख आयएमडीने दिलेली नाही.