झाडांच्या संगोपनासाठी केला असा संकल्प

0

नागपूर(Nagpur) ८ जुलै :- महापारेषण कंपनीच्या १३२ के.व्ही. उपकेंद्र बेसा येथे वन महोत्सव आठवडा साजरा करण्यात आला. तसेच वृक्षारोपनाची नितांत आवश्यकतेबाबत जनजागृति करण्यात आली. तथा ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग नागपूर ला वर्ष २०२३-२४ करिता राज्यस्तरावर दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याचे औचित्य साधून “श्रमदानाने वृक्षारोपण व संगोपन संकल्प” हा कार्यक्रम शनिवार दि. ०६/०७/२०२४ रोजी सकाळी ११ वा. संपन्न झाला. उपकेंद्रातील तसेच विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सहयोग निधी संकलन करून व श्रमदानातून १०० मोठ्या झाडांचे वृक्षारोपण केले . वीज क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी व प्रभाग क्रमांक २९ च्या माजी नगरसेविका सौ. स्वाती आखतकर असे जवळपास दीडशे ते दोनशे लोकांचे उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत झाडाचे रोप देऊन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात श्री सतीश दि.अणे, मुख्य अभियंता, महापारेषण परिमंडळ नागपूर यांनी वृक्षारोपण करून केली. या कार्यक्रमात श्री दिलीप दोडके, मुख्य अभियंता, महावितरण परिमंडळ नागपूर तसेच महापारेषण व महावितरण कंपनीचे इतर अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिकारी आणि कर्मचारी यांचे हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.

कार्यक्रमाचे आयोजन श्री अमलेश लोणारे, कार्यकारी अभियंता, ग्रहण केंद्र, रिंगमेन विभाग नागपूर व विनय मोटघरे, उपकेंद्र प्रमुख १३२ के.व्ही. बेसा उपकेंद्र यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरता, सागर सोनुले, प्रीती घाटे, सोनाली इंगळे, जयश्री उमरे, सुखदा सोनटक्के,ई. अधिकारी व अमोल येनगंटिवार, आशिष सेलोकर, विलास लेंडे, निशा पाचघरे, अखिल मुधोळकर, शुभांगीनी उतखेडे, मीनाक्षी खोंडेकर, राजेश लांजेवार, नरेश गयाल, राजेश बनोदे, परमेश्वर देशभ्रतार, पराग पुरकर, दिपक निंबाळकर, अरुण उघाडे,विवेक मुळे, हेमलता भडके, विद्या तिघरे, भालेराव,वर्षा दशमवार, मंगेश घाटे, प्रदिप राऊत, मोहन जवंजाळ, अनंता कापकर, सूर्यवंशी, नंदनवार, चौरसिया, बारेकर, सचिन पुसनाके, निशा शहाणे, सरला मेश्राम ,ई. कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता सह भोजनाने करण्यात आली.