“राष्ट्रवादीने सरकार पाडले नसते तर आरक्षण टिकले असते”

0

 

: पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan)

(Pune)पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले नसते तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण (Prithviraj Chavan on Maratha reservation) टिकवले असते, असा दावा ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. चव्हाणांच्या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने उत्तर दिले आहे. खासदार सुनील तटकरे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाणाना सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. जर आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही अर्थ नव्हता, असेही तटकरे म्हणाले.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले. जर त्यावेळी आमचे सरकार पडले नसते तर आम्ही नक्कीच मराठा आरक्षण टिकवले असते. आम्ही दोघे एकत्रित निवडणुकीला सामोरे गेलो असतो आणि 2014 मध्ये भाजपऐवजी आमचेच सरकार आले असते, असे चव्हाण म्हणाले. आम्ही सत्तेत असतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्नदेखील मार्गी लावला असता, असा दावा चव्हाण यांनी केला. त्याला खासदार तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण हे राजकारणी आहेत असा माझा आतापर्यंतचा समज होता. त्यांना हल्ली विनोद का सुचतो ते काही कळत नाही. सत्ता गेल्यानंतर आरक्षण टिकले नाही, असे म्हणण्याला अर्थ नाही. त्यांची असे बोलण्यामागची भूमिका काय हे माहिती नाही, असे तटकरे म्हणाले. आघाडी सरकारमध्ये विलासराव हे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते.