विजय वडेट्टीवार यांचा इशारा
नागपूर : शेवटी राज्य सरकारने चूक कबूल केली हे महाराष्ट्रातील लोकांना आणि MARATHA SAMAJ मराठा समाजाला कळुन चुकलेलं आहे. हा हल्ला पुरस्कृत होता हे सिद्ध झालेलं आहे. आता यासंदर्भात लवकर तोडगा काढावा.ओबीसींचे OBC आरक्षण वाढवून द्यावे, आंदोलनस्थळी जाऊन मी हेच बोललो. एक ओबीसी कार्यकर्ता म्हणून जीव गेला तरी चालेल आरक्षणाला धक्का लागू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज माध्यमांशी बोलताना दिला. Vijay Vadettiwar
राज्य आणि केंद्रात हे बहुमताचं सरकार आहे. जी भूमिका ओबीसींची आहे तीच भूमिका माझी देखील असेल. सरकार वेगळी भूमिका घेतात. बावनकुळे वेगळे बोलतात.
लोकांच्या डोळ्यात धूळफेक करत आहे का? दोन समाजात भांडण लावायची भूमिका बावनकुळे यांची असेल तर मराठा समाज जे समजायचं ते समजेल. पक्षाचा प्रमुख एक बोलतं आणि बाकीचे वेगळे बोलतात.
30 महिने घेतले तरी हे होऊ शकणार नाही.प्रश्नावर पांघरून घालण्याचे काम सरकार करत आहे. बनवाबनवी करू नका. हिंदू धर्माची आस्था आम्हाला आहे, मात्र मतासाठी वापर होऊ नये हे टाळले पाहिजे. जज चे डीमोशन का झाले, तोंड उघडायला लावू नका, फसवणाऱ्याचा बंदोबस्त केला पाहिजे.
ते इंडिया आघाडीला घाबरले आहेत.
सत्तेत असलेले 18 मंत्री यांनी भूमिका मांडली नाही. माल कमावो धोरण सुरू आहे, आमदारांना मालिदा वाटला जात आहे.या सगळ्यांची नार्को टेस्ट करा, एस.पी ला कोणी आदेश दिला, दोषीला रजा आणि डी.वाय.एस.पी निलंबित कसे, दूध का दूध पाणी का पाणी हे नार्कोतून स्पष्ट होईल, 50 टक्के आरक्षण देण्याची भूमिका कोणी स्वीकारली. माफी मागून चूक मान्य केली, यात मोठेपण दाखवला चांगला आहे पण उशीर झाला. चुकीचे गुन्हे मागे घेऊ असा शब्दांचा खेळ केला, सरसकट गुन्हे मागे घ्या अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली.













