चन्नावार्स ई विद्या मंदिर च्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

0

आयकेएस ज्ञान महोत्सव – वर्ल्ड रेकॉर्ड प्रदर्शनात

एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये मिळाली मान्यता

वर्धा : नुकत्याच सेवाग्राम येथे झालेल्या आयकेएस ज्ञान महोत्सव – वर्ल्ड रेकॉर्ड प्रदर्शन वर्धा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ऐतिहासिक ठरले.
या कार्यक्रमात चन्नावार्स ई विद्या मंदिर, वर्धा च्या विद्यार्थ्यांनी विशेष ठसा उमटविला. इयत्ता चौथ्या वर्गातील रम्यक पुरोहित यांनी “परंपरेची लय – ढोलक” हा विषय सादर करून भारतीय पारंपरिक वाद्यांच्या सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. तर रुचित पुरोहित यांनी “आयुर्वेदिक हर्बेरियम” हे चार्ट व मॉडेल्सद्वारे औषधे फक्त गोळ्या–इंजेक्शनपुरती मर्यादित नसून आपल्या आजूबाजूच्या वनस्पतींमध्येही उपलब्ध आहेत.
या जुळ्या भावंडांच्या सादरीकरणाला प्रचंड दाद मिळाली आणि त्यांची नावे एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंदवली गेली. त्यांना विशेष पदकेही प्रदान करण्यात आली.
यावेळी डॉ. मनोज तत्ववादी (एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स) यांनी अधिकृतरीत्या जाहीर केले की विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावरील सहभाग आणि विक्रमी सादरीकरणांमुळे या दोन दिवसीय उपक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये घेण्यात आली आहे. या घोषणेमुळे विद्यार्थ्यांमध्ये, शिक्षकांमध्ये आणि पालकांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण पसरले.
या ऐतिहासिक यशामुळे चन्नावार्स ई विद्या मंदिर, वर्धा ने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल केले. या कामगिरीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग, आयोजक समिती तसेच पालकांनी कौतुकाचा वर्षाव केला.
शाळेचे संचालक दिनेश चन्नावार आणि मुख्याध्यापिका अपूर्वा पांडे यांनी दोन्ही विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना या उल्लेखनीय कामगिरीबद्दल हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांचे पालक प्रशांत पुरोहित आणि सौ. पल्लवी पुरोहित यांनी शाळेबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली.