मराठा उमेदवारांना दिलासा, EWS मधून नियुक्त्या

0

मुंबई : मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असतानाच मराठा समाजाच्या रखडलेल्या नियुक्त्यांचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना आर्थिक मागास वर्गातून म्हणजचे EWS मधून नियुक्त्या मिळणार आहेत. मराठा उमेदवारांना आर्थिक मागास वर्गातील (EWS) गटात समाविष्ट करण्याचा निर्णय पूर्वानुलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने शुक्रवारी योग्य ठरवत राज्य सरकारला मोठा दिलासा दिला.

एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यावर मॅटने रोखलेल्या पदांची भरती आता करता येईल. यामुळे ४०८ उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. जवळपास २०१९ पासून या नियुक्त्या रखडल्या होत्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, वनसेवा, कर सहाय्यक, पीएसआय, कनिष्ठ अभियंता, इतर पदांसाठी या नियुक्त्या करण्यात येणार आहे. यामुळे 3 हजार 485 उमेदवारांना नियुक्त्या मिळणार आहेत. एसईबीसी आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचे प्रकरण हे न्यायालायात प्रलिंबित होते. या प्रवर्गातून या विद्यार्थ्यांना दहा टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आलीये. परंतु हे प्रकरण न्यायालयामध्ये असल्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. पण आता हायकोर्टाने या नियुक्त्या EWS मधून करण्याचे निर्देश दिले आहेत.