

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हल्लाबोल
मुंबई(MUMBAI): सत्ता येणार असल्याचा साक्षात्कार झाल्याने मविआच्या नेत्यांना अहंकार आणि घमेंड आला आहे. त्यामुळे जेलमध्ये टाकण्या वलग्ना केल्या जात आहेत. विरोधकांकडे विकासाचे मुद्दे नाहीत; ते वैफल्यग्रस्त झाले आहेत. रावणासारखे अहंकारी झाले आहेत, असा हल्लाबोल भाजप नेते सुधीर मुनगंटीवार(Sudhir Mungantiwar)यांनी केला
आहे.
पालघरच्या सातपाडी येथे जाहीर सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले, मी लहानपणी महर्षी वाल्मिकी यांचे रामायण वाचले आहे. त्यामध्ये महत्वाचा भाग आहे, तो माता सितेचे हरण. रावण नाशीकच्या पंचवटीमध्ये मायावी रुप घेऊन आला आणि माता सितेचे हरण केले. अगदी त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रात काही लोक मायावी विचार घेऊन लोकशाहीचे हरण करण्याचे प्रयत्न करत आहेत, असे राज्याचे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
ते म्हणाले, मी लहान असताना नगरपरिषदेच्या शाळेत ‘डोलकर.. डोलकर… दरीयाचा राजा..’ हे गाणे ऐकले होते. तेव्हापासून हा राजा दरियाशी लढणारा आहे, हे मला माहिती आहे. हा माझा राजा लढणारा आहे. मच्छीमार बांधवांना ५३९.७१ कोटीचा डिझल परतावा आमच्या सरकारने दिला. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वात शक्य झाले. यापुढे डिझल परताव्यासाठी मच्छीमार बांधवांना खेटे घालावे लागणार नाही, असा कायदा करण्यासाठी आमचे सरकार पुढाकार घेणार आहे, असेही ते म्हणाले.