Ration will be stopped if you do ‘these’ things ‘या’ गोष्टी करत असाल तर बंद होणार रेशन

0

Ration will be closed if you are paying income tax अमरावती (Amravti)6 ऑगस्ट राष्ट्रीय अन्नसुरक्षाअधिनियमातील तरतुदीनुसार जे कार्डधारक आयकर भरतात, त्यांना मोफत रेशन मिळत असलेली शिधापत्रिका रद्द करण्याचे निर्देश (Instructions for cancellation of ration card)देण्यात आले आहेत. त्याचे चोख पालन करत शासनस्तरावरून पाठविण्यात आलेल्या यादीतील शिधापत्रिका प्राधान्याने रद्द करण्याची कार्यवाही पुरवठा विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

उत्पन्न अधिक असलेल्या कार्डधारकांनी रेशनवरील धान्य सोडून देणेच हिताचे ठरणार आहे. कायद्यानुसार, जे लोक आयकर भरतात, त्यांना शासनस्तरावरून पुरविण्यात येणारे मोफत रेशन घेता येत नाही. याशिवाय ज्यांच्याकडे दहा एकरांपेक्षा अधिक शेतजमीन आहे. अशा मंडळींनाही मोफत धान्य दिले जाऊ नये, असे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, अशा लोकांची यादी तयार करून ती त्या-त्या जिल्ह्याकडे यापूर्वीच शासनाने पाठविली आहे. त्यात नमूद लोकांचे धान्य मिळणारे कार्ड रद्द करून संबंधितांना पांढरी शिधापत्रिका देण्याची कार्यवाही केली जात आहे. ज्यांनी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासन स्वस्त धान्य दुकानदाराकडे जाऊन धान्यादी मागणी केलेली नाटी आधार लिंक केले नाही, अशा लाभार्थ्यांचेही कार्ड रद्द होणार आहे.

शासनस्तरावरून आयकर भरणाऱ्यांची यादी पुरवठा विभागाकडे पाठविण्यात आली आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांत संबंधितांची शिधापत्रिका रद्द करून पांढरी शिधापत्रिका देण्यात आली. सध्या स्थितीत १८६ आयकर भरणाऱ्यांचे रेशन बंद झाले आल्याची माहिती आहे. एखाद्या शिधापत्रिकाधारक आयकर भरत असूनही ते स्वस्त धान्याचा लाभ घेत असेल किंवा धान्याची उचल करत असेल आणि त्यांनी कार्ड पुरवठा विभागाकडे वापस केले नसेल तर सरकार त्या व्यक्तीकडून २७ रुपये प्रति किलोप्रमाणे धान्याची किंमत वसूल करू शकते. अपात्र ठरल्यापासून केलेल्या धान्याच्या उचलीची रक्कम वसुली केली जाते.