शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन

0

 

अमरावती- अमरावतीत शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सोयाबीन, कापूस, तूर, कांदा व संत्राला योग्य हमी भाव देण्यात यावा, यासोबतच विदर्भातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी उपाययोजना या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरावती अध्यक्ष अमित अढावू यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी नांदगाव पेठ टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये महिला शेतकऱ्यांचा देखील सहभाग होता. यावेळी शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी मोडीत काढल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केला आहे.

राजगिऱ्याच्या पिठाचे लाडू | Rajgira Pithache Laadoo | Shankhnaad News #shankhnaadnews #live