सरकारी कर्मचाऱ्यांना प्रतिबंध घालणारा 58 वर्षांपूर्वीचा तो आदेश अखेर मागे; काय घडलं होत त्या काळी

0

आता सरकारी कर्मचारीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. केंद्र सरकारने 58 वर्षे जुनी बंदी उठवली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने एक आदेश जारी करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सर्व कार्यात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी उठवली आहे.

एका वृत्तानुसार, भारतीय सरकारने 58 वर्षांपूर्वीचा सरकारी कर्मचाऱ्यांना RSS च्या उपक्रमात सहभागी होण्यास मनाई करणारा आदेश मागे घेतला आहे. हा आदेश 1966 मध्ये इंदिरा गांधी सरकारने जारी केला होता.

माहितीनुसार, मागील केंद्र सरकारांनी 1966, 1970 आणि 1980 च्या आदेशात सुधारणा केल्या आहेत, ज्यामध्ये काही इतर संस्थांसह सरकारी कर्मचाऱ्यांवर RSS शाखा आणि इतर क्रियाकलापांमध्ये सहभागासाठी कठोर दंडात्मक तरतुदी लागू केल्या होत्या.

यापूर्वीच्या काँग्रेस सरकारांनी वेळोवेळी सरकारी कर्मचाऱ्यांना आरएसएसच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यास बंदी घातली होती. आरएसएसच्या कार्यात सहभागी असल्यास कर्मचाऱ्यांना कठोर शिक्षा देण्याची तरतूदही लागू करण्यात आली होती.