suruchi Masale : सुरुची स्‍पायसेसचा रणबीर कपूर नवीन ब्रँड ॲम्बेसेडर

0
suruchi Masale : सुरुची स्‍पायसेसचा रणबीर कपूर नवीन ब्रँड ॲम्बेसेडर
ranbir-kapoor-is-the-new-brand-ambassador-of-suruchi-masala-suruchi-spices

नागपूर (Nagpur) 26 ऑगस्ट 2024 :-  भारतीय मसाला उद्योगातील एक अग्रगण्य नाव असलेल्‍या सुरुची मसालेला त्यांचा नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्‍हणून बॉलीवूडचा सुपरस्टार रणबीर कपूर यांची घोषणा करताना आनंद होत आहे. सिल्‍व्‍हर स्‍क्रीनवर आपल्‍या अष्टपैलू व करिष्‍माई व्‍यक्तिमत्‍वासाठी प्रसिद्ध असलेल्‍या रणबीर कपूर यांच्‍याशी झालेला हा करार सुरुची मसालेसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून यामुळे मसाल्यांच्या प्रीमियम श्रेणीद्वारे भारतीय पाककृतींची लज्‍जत सादर करीत आहे.
सुरुची मसाले बद्दल…
नागपूर स्थित प्रसिद्ध ब्रँड सुरुची मसालेची स्‍थापना श्री सुभाषजी जैन यांनी 1979 मध्ये केली होती. व्यवस्थापकीय संचालक श्री रविजी सुभाष जैन यांच्या नेतृत्वाखाली भारतातील मसाले उद्योगातील एक अग्रगण्य नाव असलेले सुरुची मसाले गुणवत्ता आणि प्रामाणिकतेसाठी वचनबद्ध आहे. 45 वर्षांहून अधिक काळापासूनच हा  वारसा असलेल्‍या सुरुची मसालेद्वारे विविध प्रकारचे मसाले, पापड, लोणची, सॉसेस, केचअप आणि इन्‍स्‍टंट मिक्स अशा विविध पदार्थांची शृंखला उपलब्‍ध करून देण्‍यात आली असून प्रत्येक स्वयंपाकघरात भारतीय चवीची लज्‍जत देते. हा ब्रँड शुद्धता आणि चव यांची सर्वोच्च मानके राखत उत्कृष्ट घटकांच्‍या सहायाने प्रत्येक उत्पादन तयार करण्यासाठी समर्पित आहे. पारंपारिक पाककृती असोत किंवा आधुनिक पाककृती तयार करण्‍यासाठी सुरुची मसाले हा गृहिणी (Suruchi Masale) आणि व्यावसायिक शेफसाठी एक विश्वासार्ह पर्याय आहे.
या नवीन भागीदारीबद्दल उत्‍साही असलेला रणबीर कपूर (Ranbir Kapoor) म्हणाला, “सुरुची परिवाराचा एक भाग होण्यासाठी मी खूप उत्‍सूक आहे. आइये, हम सब साथ मिल कर सुरुची के प्रोडक्ट्स को घर घर तक पहुचाएं। “जब खाने में हो रुची, तो चेंज टू सुरुची”
सुरुची मसालेचे तांत्रिक संचालक मयंक जैन म्‍हणाले, “रणबीर कपूर सुरुची मसाले परिवारात सहभागी झाल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. व्‍हायब्रंट व्यक्तिमत्व आणि भारतीय संस्कृतीवर असलेले खरे प्रेम त्याला आमच्या ब्रँडसाठी नैसर्गिकरित्या योग्‍य बनवते. मला खात्री आहे की, ही भागीदारी सुरुची मसालेला नव्‍या उंचीवर नेईल आणि देशभरातील लाखो लोकांच्‍या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवेल. आम्ही एकत्रितपणे अस्सल लज्‍जत आणि दर्जेदार सुरुची मसालेसाठी आमच्या वचनबद्धतेचा प्रचार करीत राहू. ” जब खाने में हो रुची, तो चेंज टू सुरुची”
सुरुची मसाले उत्पादन सुविधा बीआरसी, यूएस एफडीए आणि एफएसएसएआय मानकांनुसार प्रमाणित असल्‍याचा आम्‍हाला अभिमान आहे. ते उत्पादनांमध्ये उच्च क्षमतेची स्वच्छता आणि गुणवत्ता सुनिश्चित करतात.  आरोग्य आणि पर्यावरण या दोन्हींबद्दल आम्‍ही समर्पित असून आमच्या संपूर्ण सुविधांमध्ये हरित सौर ऊर्जेचा वापर करून शाश्वततेसाठी वचनबद्ध आहोत, असे विपणन संचालक श्री प्रकाशजी कटारिया यांनी सांगितले.
Suruchi product list
Suruchi masala contact number
Suruchi Spices
Suruchi Masala owner
Suruchi Chilli Powder 500g price
Suruchi Pickles
Suruchi Masala net worth
Suruchi Foods Price list