

पण आता तुम्हीच काढा तुतारीचा काटा’
आठवलेंच्या कवितेनं माढ्यात चढला जोर
सोलापूर 4 मे : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या कवितेमुळे प्रचारात वेगळीत रंगत चढल्याचं पाहयला मिळालं. माढा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची जोरदार एन्ट्री झाली .माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथे झालेल्या सभेत आठवले यांनी आपल्या खुमासदार कवितेतून वातावरण हलके फुलके केले. (Athawale Ramdas Bandu)
मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, मोहिते पाटील आणि त्यांच्या कुटुंबाचा 10 वर्ष मला निवडून आणण्यात होता मोठा वाटा , पण आता तुम्हीच काढा तुतारीचा काटा असे सांगितले. यावेळी त्यांनी सादर केलेल्या कवितेला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली आहे. यावेळी भाजप उमेदवार खासदार रणजित निंबाळकर , राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे , भाजप आमदार प्रसाद लाड आणि रिपाई व महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी सरकार हे खरे संविधानाचे रक्षक असून विरोधकांकडून संविधान बदलण्याचा खोटं प्रचार केला जात असल्याचे त्यांनी सांगितले .