मुंबई-२२ जानेवारी रोजी अयोध्येतील नवनिर्मित राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर वेगळाच दावा करण्यात आला आहे. राम मंदिर वादग्रस्त भूखंडापासून ४ किलो मीटर दूर बांधण्यात आल्याचा दावा ठाकरे गटाकडून सुरु आहे. शिवसेनेच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा दावा केला आहे.
खासदार राऊत यांनी दावा केलाय की, ज्या ठिकाणी मंदिर बांधण्याचा दावा केला जात होता, त्या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलेले नाही. तेथून ४ किलोमीटर दूर मंदिर बांधण्यात आले आहे. हे काम कुणालाही करता आले असते, असे ते म्हणाले. त्यांच्या या दाव्यामुळे राम मंदिराविषयी एक नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
खासदार राऊत म्हणाले की, ‘मंदिर वही बनाएंगे’ असा भाजपाचा नारा होता. पण तुम्ही तेथे जाऊन पाहा. मंदिराची निर्मिती जेथे होणार असल्याची चर्चा होती, तेथे मंदिराची निर्मिती झालेलीच नाही. तेथून ४ किलो मीटर अंतरावरते बांधण्यात आले आहे. ते कोणीही बांधले असते. पण त्यावर आम्हाला चर्चा करायची नाही. ती वादग्रस्त जागा आजही तशीच आहे. यावर भाजपान बोलायला हवे, असे राऊत म्हणाले.














