राकेश टिकैत म्हणतात, “पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील..”

0

(Lucknow)लखनऊ: शेतकरी आंदोलनाने एकेकाळी केंद्रातील मोदी सरकारच्या नाकीनऊ आणले होते. त्या आंदोलनाचे नेते (Rakesh Tikait)राकेश टिकेत यांनी देशात पुन्हा भाजप सरकार येईल व मोदीच पंतप्रधान होतील, असे भाकित वर्तविले आहे.

टिकैत यांनी म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपच सत्तेत राहिल. सुरुवातीला नरेंद्र मोदीच पंतप्रधान होतील. पण ते मध्येच पदावरुन पायउतार होतील आणि राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारतील. त्यांच्या जागी अमित शहा पंतप्रधान होतील. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री केंद्रात गृहमंत्री होतील. ते शहांची जागा घेतील, असे टिकैत म्हणाले. शेतकरी नेते असलेल्या टिकेत यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये कृषी कायद्यांच्या विरोधात छेडलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकार अडचणीत आले होते. हजारो शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतल्यावर सरकारला कृषी कायदे रद्द करावे लागले होते. भाजपच्या विरोधात सर्व एकत्र आले नाही तर मारले जातील, असेही टिकैत यांनी म्हटले आहे.