गहलोतांवर ओेएसडीनेच डागली तोप

0

जयपूर JAYPUR -राजस्थानमध्ये काँग्रेसचा धक्कादायक पराभव झाला. या पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झाला असतानाच स्वतः मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे ओएसडी लोकेश शर्मा यांनी पराभवावर भाष्य करताना त्यासाठी स्वतः गहलोत यांना जबाबदार धरले आहे. हा पराभव काँग्रेसचा नसून स्वतः गहलोत यांचा पराभव असल्याचे शर्मा यांनी एक्सवर पोस्टमध्ये नमूद केले आहे. (Rajasthan CM Ashok Gehalot)

“काँग्रेस पक्ष राजस्थानमध्ये नक्कीच परंपरा बदलू शकत होता. पण अशोक गहलोत यांना कधीच कुठला बदल नको होता. त्यामुळे हा काँग्रेस पक्षाचा नाही, तर अशोक गहलोत यांचा पराभव आहे.प्रत्येक जागेवर आपण स्वतःच लढत आहोत, असे गहलोत यांना वाटत होते. पण या निवडणुकीत ना त्यांचा अनुभव कामी आला, ना जादू, असे ते नमूद करतात. शर्मा यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत गहलोत पक्षाकडून फक्त घेतले आहे. पण ते सत्तेत असताना कधीच पक्षाला पुन्हा सत्ता मिळवून देऊ शकलेले नाहीत. पक्षातील हायकमांडला फसवून, त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचू न देता, दुसरा कुठलाही पर्याय उभा राहू न देणे, स्वार्थी लोकांमध्येच राहून सातत्याने चुकीचे आणि गडबडीत निर्णय घेणे, सर्व प्रकारच्या अंदाजांकडे दुर्लक्ष करून मनमानी पद्धतीने आणि आपल्या आवडत्या उमेदवारांनाच त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असूनही तिकीट देण्याचा हट्ट करणे अशा गोष्टी पराभवासाठी कारणीभूत ठरल्या, असेही ते म्हणाले.

शर्मा शेवटी म्हणतात की, २५ सप्टेंबरची घटना देखील पूर्णपणे प्रायोजित होती. काँग्रेस हायकमांडच्या विरोधात बंड करुन अवमान केला गेला आणि त्या दिवसापासूनच हा खेळ सुरु झाला होता, असेही ते म्हणाले.