राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.
“दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरुषाची साधना”
या काव्यपंक्ति अक्षरश: जगलेला राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज होय. मात्र, 19 व्या शतकात होऊन गेलेला हा राजा आजही का आठवणीत राहिला आहे? त्यांची आजही का आठवण काढली जाते? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांचे समकालीन असलेल्या अनेकांना तसेच त्यांच्या नंतरही अनेक मोठ्या व्यक्तींना भुरळ पाडली आहे. त्यांची आठवण का काढली जाते? याचं उत्तर आपल्याला त्यांनी राजर्षी शाहू महाराजांविषयी काढलेल्या गौरवोद्गारातून मिळतं.
महाराजांचा जन्म 26 जून 1874 चा. कागलच्या घाटगे घराण्यातील अप्पासाहेब आणि राधाबाईर यांच्या पोटी यशवंत या नावाने महाराजांनी जन्म घेतला. तेंव्हा कोल्हापूरमध्ये राजे चौथे शिवाजी महाराज कारभार पाहत होते. पण दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर 17 मार्च 1884 रोजी चौथ्या शिवाजी महाराजांच्या पत्नी आनंदीबाई यांनी यशवंतांना दत्तक घेतले आणि नव्याने त्यांचे शाहू असे नामकरण केले. 2 एप्रिल 1894 रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ पार पडला आणि शाहू कोल्हापूर संस्थानचे राजर्षी शाहू महाराज झाले. शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली होती. ज्या दिवसापासून शाहू महाराजांनी पदभार स्वीकारला तेंव्हापासून 1922 सालापर्यंत तब्बल 28 वर्षे कारभार करत कोल्हापूर संस्थानात रयतेचे राज्य निर्माण केले. शाहू महाराजांच्या मनात सामान्य जनतेबद्दल अतिशय कळवळा होता. विशेष करून बहुजन समाजाची तत्कालीन स्थिती सुधारणे हे त्यांचे प्राथमिक ध्येय होते. त्या दिशेने पाऊल टाकीत त्यांनी सर्वप्रथम त्या समाजातील घटकांना साक्षर करण्याचे शिवधनुष्य उचलले. समाजात शिक्षणाचा मोठ्या स्तरावर प्रसार केला. संपूर्ण कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मुख्य म्हणजे मोफत केले. त्यासाठी म्हणून त्यांनी उज्जभ्रू वर्णाच्या आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा चालवण्याची जी पद्धत होती ती बंद केली.
मागासलेल्या वर्गांना विकासाच्या प्रवाहात आणायचे असेल तर त्यांच्यासाठी राखीव तरतूद केली पाहिजे अशी कल्पना महात्मा फुले यांनी केली होती ती. प्रत्यक्षात, शाहू महाराजांनी सत्यात उतरवली. 6 जुलै 1902 रोजी कोल्हापूर संस्थानातील मागास जातींना 50% जागा. राखीव करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. समाजातील सर्व घटकांना समानतेची वागणूक मिळावी. म्हणून त्यांनी शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी, सार्वजनिक इमारती सर्वांसाठी खुल्या केल्या, डेक्कन रयत असोसिएशन ही देखील शाहू महाराजांचीच देणं होय. 1917 साली त्यांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा संमत करून घेतला.
वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष राजर्षी शाहूंच्याच काळात झाला हे महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळाच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ याला अजून प्रेरणा मिळाली. बहुजन अस्पृश्य समाजाच्या सर्वांगीण विकास साधण्याचे कार्य करताना त्यांनी एका अर्थाने महात्मा फुले यांचीच परंपरा पुढे चालवली. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल शाहूपुरी व्यापरपेठ गुळाची बाजारपेठ शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था राधानगरी धरणाची उभारणी असे प्रयोग त्यांनी कोल्हापूर संस्थानात राबवले. राजर्षी शाहूंनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट,चित्रकला लोककला आणि कुस्ती या क्षेत्रातील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य केले. शाहू महाराजांनी कोल्हापूर आणि बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीरांना वेळोवेळी आर्थिक आणि इतर मदददेखील केली.
कार्य
ब्रिटिशांच्या काळात सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करुन दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार केला आहे. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री (Women) शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. त्यांना आरक्षणाचे जनक म्हणूनही ओळखले जाते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबडेकरांनी सुरु केलेले मूकनायक पाक्षिक हे आर्थिक अडचणींमुळे बंद पडले हे शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ आर्थिक मदत केली.