राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील-संदीप देशपांडे

0

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीगाठी वाढत असल्याने मनसे आणि शिवसेना युती होणार का, असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. या चर्चेवर मनसेच्या एका नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. युतीबाबत राज ठाकरे योग्यवेळी निर्णय घेतील तसेच ते मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. आताचे मुख्यमंत्री भेटतात, मात्र आधीचे मुख्यमंत्री भेटत नव्हते, असेही ते म्हणाले. (Shiv Sena & MNS Alliance)संदीप देशपांडे म्हणाले, राज्याचे प्रश्न घेऊन राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटतात. त्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळतो. मार्ग काढला जातो.

शेवटी जनतेचे प्रश्न मांडण्यासाठीच आपण सर्वजण राजकारणात आहोत, त्यामुळे ती गोष्ट करण्यासाठी भेट होत असेल तर त्यात वावगे काही नाही, असे ते म्हणाले. राजकारणात कधी काय होईल? हे काही आज सांगता येणार नाही. २०२४ च्या पोटात काय दडलंय? हे देखील कोणाला माहिती नाही. पण यासंदर्भातील जो काही निर्णय असेल तो राज ठाकरे योग्य वेळी घेतील. तो महाराष्ट्राच्या हिताचा, हिंदुत्वाच्या हिताचा आणि मराठी माणसाच्या हिताचा असेल, असे ते म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा राज ठाकरे यांच्याकडेच असल्याचे ते म्हणाले.