राज ठाकरे यांची गाडी अडवली; मनसे कार्यकर्ते आणि आंदोलक आमनेसामने

0
राज ठाकरे यांची गाडी अडवली; मनसे कार्यकर्ते आणि आंदोलक आमनेसामने
Raj Thackeray car stopped; MNS and protesters face to face

 

बीड:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे आज बीडमध्ये (Beed) दाखल झाले आहेत. त्यांची बीडमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी राज ठाकरे बीडमध्ये ठरलेल्या हॉटेलजवळ आले तेव्हा धक्कादायक प्रकार बघायला आले. राज ठाकरे यांचा ताफा हॉटेलबाहेर दाखल होताच गळ्यात भगवा गमछा घातलेल्या तरुणांनी जोरदार गोंधळ घातला. त्यांनी राज ठाकरे यांचा ताफा अडवला. तसेच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली. सुरुवातीला संबंधित तरुण हे मराठा आंदोलक असल्याची माहिती समोर आली. यानंतर ते ठाकरे गटाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली.

आंदोलक तरुणांनी राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकल्या. यावेळी तिथे उपस्थित मनसे कार्यकर्ते देखील संतापले. त्यांनी या आंदोलकांचा प्रतिकार केला. यावेळी दोन्ही गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. आंदोलक आणि मनसे कार्यकर्ते यांचा वाद सुरु झाला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण या घटेनमुळे संबंधित परिसरात तणाव निर्माण झाला आहे. हॉटेलबाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे. पोलिसांकडून राज ठाकरे यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे.