

अकोला: (AKOLA)अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यात वाडेगाव कृषी बाजार समितीमध्ये पावसामुळे लाखो रुपयांचा शेतमाल भिजला आहे. बाळापुर तालुक्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह आलेल्या जोरदार (Rain)पावसामुळे बाजार समितीत(FARMER) शेतकऱ्यांकडून विक्री केलेला शेतमाल भिजला आहे. सुमारे ३० ते ५० टक्के शेतमाल भिजला आहे. हरभऱ्याला कोंब देखील फुटले आहेत.वाडेगावच्या बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला लाखो रुपयांचा शेतमाल उघड्यावर असल्याने पावसात भिजुन गेला आहे.यात सर्वाधिक प्रमाण सोयाबीनचे आहे. तूर आणि हरभरा ओला असल्याने याचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला आहे. कृषी बाजार समितीत कुठल्याही प्रकारची शेतमाल ठेवण्यासाठी सोय नसल्याने अनेकदा शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो.