पुन्हा पावसाच्या सरी; शेतकऱ्यांच्या चेहरा आनंदी आणि समाधानी

0

 

गोंदिया GONDIYA : गेल्या दोन दिवसापासून दिवसा ढगाळ वातावरण हा जिल्ह्यात असून सकाळी अनेक ठिकाणी पावसाच्या सरी पुन्हा बरसल्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आलं. सध्या भात पिकाच्या रोवणी काम पूर्ण झाले असून भात पिकाला पावसाची नितांत गरज होती आणि त्याच वेळेत पाऊस आल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. मात्र अजूनही जोरदार पाऊस जिल्ह्यात आतापर्यंत आला नाही. त्यामुळे शेतकरी अजूनही जोरदार पावसाची अपेक्षा करत आहेत.