

मुंबई (Mumbai), १४ऑगस्ट: यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सरासरीपेक्षा २७ टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर देशभरात हा आकडा पाच टक्के जास्त आहे. १ जून ते १२ ऑगस्ट या कालावधीत राज्यात ६६९.४ मिलिमीटर पावसाच्या सरासरीच्या तुलनेत ८५२.८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
देशाच्या पातळीवर विचार केल्यास, या कालावधीत सरासरी ५६१.९ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत ५९२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः तमिळनाडू आणि पुदुचेरी येथे सरासरीपेक्षा अनुक्रमे ९२% आणि ८६% अधिक पाऊस झाला आहे. लडाख (Ladakh), सिक्कीम(Sikkim), दिल्ली (Delhi), राजस्थान (Rajasthan), गोवा (Goa), महाराष्ट्र(Maharashtra), आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), आणि कर्नाटक (Karnataka)या सात राज्यांतही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.
दुसरीकडे, मणिपूरमध्ये सरासरीपेक्षा ३६% कमी पाऊस पडला आहे, तर ईशान्य भारतातील काही राज्ये, बिहार, पंजाब, हिमाचल प्रदेश, आणि जम्मू-काश्मीरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
सध्या देशभरात पावसाने उघडीप घेतली असून, कमाल तापमान चार ते पाच अंश सेल्सिअसने वाढले आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महिनाअखेरीस पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.