

२०० कोटींची रोकड जप्त
(Ranchi)रांची-झारखंडमध्ये काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार धीरज साहू यांचे निवासस्थान व त्यांच्याशी संबंधित दारु निर्मिती कंपन्या तसेच अन्य ठिकाणांवर पडलेल्या आयकर छाप्यांमध्ये सुमारे 2०० कोटीची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे खळबळ माजली आहे. रांची येथील रेडियम रस्त्यावर असणाऱ्या सुशीला निकेतन या निवासस्थानाबरोबरच ओडिशा येथील बलांगीर, संबलपूर आणि कालाहांडी मधील एक-एक ठिकाणांवर छापेमारी करण्यात आली. दरम्यान, या कारवाईनंतर पंतप्रधान मोदी यांनी स्वतः एक्सवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “देशवासीयांनी नोटांचा हा ढीग बघावा आणि नंतर यांच्या नेत्यांची प्रामाणिकपणाची भाषणे ऐकावी..जनतेच्या लुटीतील एक एक पैसा परत करणार, ही मोदीची हमी आहे”, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
खासदार साहू यांच्याकडे नोटांनी भरलेली अलमारी आढळून आली. एखाद्या बँकेच्या लॉकरप्रमाणे ही अलमारी आहे. तब्बल ३०० कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. रांची आणि लोहरदगा येथील साहू यांच्या निवासस्थानासह पाच ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली. आयकर विभागाच्या ओडिशा टीमच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ही कारवाई सुरु झाल्याची माहिती आहे. कारवाईवेळी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले होते.