

नागपूर (Nagpur) :भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे महविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार डॉ प्रशांत पडोळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांची आज शनिवारी दुपारी 4 वाजता जाहीर सभा होणार आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चंद्रपूर आणि रामटेक मतदारसंघात कन्हान येथे दोन सभा झालेल्या असताना राज्यातील राहुल गांधी यांची ही पहिलीच निवडणूक प्रचार सभा असणार आहे.विशेष म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या होम ग्राऊंडवर ही जाहीर सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 14 एप्रिल रोजी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपुरात दीक्षाभूमी येथे येणार असून चंद्रपूर मतदारसंघात त्यांची सभा होणार आहे. प्रियंका गांधी यांच्या दौऱ्याबाबत आज अनिश्चितता आहे.