राहुल द्रविड कोच म्हणून कायम राहणार

0

(Mumbai)मुंबई : टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड कायम राहणार आहेत. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) राहुल द्रविड (Rahul Dravid)यांच्या करारात वाढ केली आहे. २०२३ च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेनंतर त्याचा करार संपला होता. मुख्य कोच राहुल द्रविड यांच्यासह सहायक स्टाफचा करारही वाढवण्यात आला आहे.
वनडे विश्वचषकानंतर (World Cup 2023) राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला होता. बीसीसीआयने राहुल द्रविड याला कार्यकाळ वाढवण्याची विनंती केली होती. राहुल द्रविड यांनीही ही ऑफर स्विकारली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) एनसीए प्रमुख (Head of NCA ) म्हणूनच काम पाहणार आहेत. त्याशिवाय ते स्टँड इन मुख्य कोच असतील म्हणजेच राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत लक्ष्मण भारतीय संघाला मार्गदर्शन करतील.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाच भारतीय संघाने 2022 टी-२० वर्ल्ड कपमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. याशिवाय २०२२-२३ चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२३ ची विश्वचषक फायनलही गाठली होती. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, तपूर्वी टीम इंडिया अपराजित राहिली होती.