राधिका क्रिएशन्स पुणे नागपूर प्रस्तुत “संघ गंगा ते तीन भगीरथ”

0

(Rashtriya Swayamsevak Sangh)राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालकांच्या जीवन आणि कर्तृत्व यावर आधारित दोन अंकी नाटक राधिका क्रिएशन तर्फे एक मे रोजी सायंकाळी पाच वाजता आणि रात्री आठ वाजता स्थानिक वनामती सभागृहात होणार आहे. हे दोन अंकी नाटक हिंदीमध्ये असून श्रीधर गाडगे यांनी ते लिहिले आहे आणि संजय पेंडसे यांनी दिग्दर्शित केलं आहे. निर्मिती प्रमुख आहेत सारिका पेंडसे. दिनांक 30 एप्रिल रोजी प्रमुख उपस्थिती माननीय भैयाजी जोशी; अखिल भारतीय कार्यकारणी मंडळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि माननीय नितीनजी गडकरी; केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक, यांच्या उपस्थितीत हा प्रयोग निमंत्रितांसाठी होणार आहे. संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकाचे नेपथ्य सतीश पेंडसे यांचे असून प्रकाशयोजना किशोर बत्तासे यांची आहे. रंगभूषा बाबा खिरेकर, नाना आंबुलकर यांची आहे. तर संगीत डॉक्टर भाग्यश्री चिटणीस यांचं आहे.

या नाटकात सहभागी कलावंत आहेत एडवोकेट रमण सेनाड, यशवंत चोपडे, मनीष उईके,अनिकेत मुन्शी, रविदत्त हळवे,सौरभ मसराम, सुरेंद्र घरडे, प्रद्युम्न बायस्कर, नचिकेत म्हैसाळकर, राधिका सेनाड, मीनल मुंडले, स्वप्नगंगा खटी, संकल्प पायाळ चिन्मय देशकर, शैलेश भलमे,मधुस्मिता गहलोद, स्वप्नील जतकर, मल्हार रानडे, अनुप रानडे, अनिकेत गोंडाणे, हेमंत जिचकार, अंजली जोशी, शंतनु मंगरूळकर, प्रज्वल भोयर, सुधीर चिटणीस, अंतरा देशपांडे, आसावरी जोशी, अभिषेक काणे, रमेश शेळके आणि आशिष पवार.

या सादरीकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन संघचालकांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घटना जसे महात्मा गांधी आणि डॉक्टर हेडगेवार यांची भेट, गुरुजी आणि वल्लभभाई पटेल यांची भेट, कश्मीरचे प्रश्न सोडवण्याकरता गुरुजींनी केलेली शिष्टाई आणि हेडगेवार यांचा बालपणीचा वंदेमातरम प्रसंग अशा अनेक घटनांचा समावेश आहे. नाट्य रसिकांनी याचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन निर्मिती प्रमुख नीलिमा बावणे, अरुणा पुरोहित, डॉक्टर विजय तुंगार यांनी केले आहे.