

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहर तर्फे आज गुरूवार दि.३ एप्रिल २५ रोजी दुपारी पक्ष कार्यालय गणेशपेठ नागपूर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या फोटोला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांची स्मृतिदिन दरवर्षी ३ एप्रिल रोजी साजरी केली जाते. ही तिथी त्यांच्या मृत्यूच्या स्मृत्यर्थ साजरी केली जाते. शिवाजी महाराजांचा मृत्यू ३ एप्रिल १६८० रोजी रायगडावर झाला होता. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे शासनकर्ते, योद्धे आणि राजकीय नेते होते. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराजांची आज गुरुवार ३ एप्रिल ३४५ वी पुण्यतिथी आहे. प्रजेच्या हितासाठी अहोरात्र झटणारा राजा म्हणून शिवरायांची ओळख होती. त्यांच्या धाडसाच्या, शौर्याच्या कथा आजही अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
यावेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिवराज(बाबा) गुजर, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, तानाजी वनवे, विशाल खांडेकर, अनिता शर्मा, मालुताई वनवे, यशश्री बनसोड, पांडुरंग गायकी, बिरू सिंग, राहुल सिंग, अरविंद ढेंगरे, शहजाद शेख, पुरोहित कांबळे, राजू मून, आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.