
फडणवीसांनी दिला हा सल्ला!
नागपूर NAGPUR – MARATHA ARAKSHAN मराठा आरक्षणाच्या आग्रही मागणीसाठी Manoj Jarange मनोज जरांगे आपल्या समर्थकांसह नवी मुंबईत दाखल झालेत. त्या पार्श्वभूमीवर नागपुरात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याचा सल्ला आंदोलकांना दिलाय.
नागपुरात बोलताना फडणवीस म्हणाले की, न्यायालयाने सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. उच्च न्यायालयाने आम्हाला जे निर्देश दिले आहेत, कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार आहे. आंदोलन शांततेने आणि नियमाने झाले पाहिजे, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल. त्यासोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येतील, याचेही प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रयत्न सुरू आहेत, असेही फडणवीस म्हणाले.