
(Nanded)नांदेड – (Punyashloka Ahilya Devi Holkar)पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून नांदेड शहर व (District Congress Committee)जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस कार्यालय येथे जयंती साजरी करण्यात आली. नांदेड शहरांमध्ये माजी मुख्यमंत्री (Ashok Chauhan)अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार असल्याची माहिती माजी पालकमंत्री डी पी सावंत यांनी दिली. तसेच त्यांनी सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.