
आंध्रप्रदेशातील गाय गोरक्षण धाममध्ये रमल्या : उंची दोन फुट, वजन २०० किलो
नागपूर(Nagpur) २२ जून :-  श्री.सिद्धिविनायक सेवा फाउंडेशनच्या वतीने झिल्पी मोहगाव येथे श्री सिद्धिविनायक गोरक्षण धामची स्थापना करण्यात आली आहे. या गोरक्षण धाममध्ये पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या पंगनूर प्रजातीच्या गायींचे आगमन झालेले आहे. श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिरामध्ये या गायी दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनी या गायींचे दर्शन घेण्यासाठी श्री. सिद्धिविनायक मंदिर परिसरात भेट द्यावी, असे आवाहन श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
 भारतात गायींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातलीच पंगनूर ही एक प्रजाती आहे. आंध्रप्रदेशातील पुंगनूर गावात ही गाय आढळते. या गायीला पौराणिक व आध्यात्मिक महत्व प्राप्त आहे. या गायीबाबत अनेक आख्यायिका देखील प्रचलीत आहेत. आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील पुंगनूर गाय अत्यंत गुणकारी आहे. श्री. सिद्धिविनायक गोरक्षण धाममध्ये या विशेष गायींचा सहवास रहावा, या हेतूने श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर श्री. संदीप जोशी यांच्या पुढाकाराने या गायी आणण्यात आलेल्या आहेत.
अवघी दोन फूट उंची असलेल्या या गायी अत्यंत गोड आणि मायाळू आहेत. पांढऱ्या रंगाच्या या गायींचे वजन २०० किलो असून वर्षाला १२०० लीटर दूध देतात. असे म्हणतात की, जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा मंथनातून १४ रत्न निघाले, त्यातील दुसरे रत्न म्हणजे कामधेनू. ही कामधेनू म्हणजे ही पूंगनूर बटू गाय! ऋग्वेदात या गायींचे महत्व विषद केले आहे. ऋषी विश्वामित्रांकडे हिच बटू गाय होती. तसेच तिरुपतीच्या व्यंकटेशाला अभिषेक करताना आणि मंदिरातील सगळा प्रसाद तयार करताना याच गायीच्या दुधाचा उपयोग होतो. आंध्रप्रदेशातून मोहगाव झिल्पी येथील गोरक्षण धाममध्ये आणलेल्या या गायी इथल्या वातावरणात अत्यंत आनंदाने खेळत आहेत. या गायींचे महत्व जाणून घेण्यासाठी आणि त्यांच्या सौंदर्य चपळतेची अनुभूती घेण्यासाठी गायींचे दर्शन घेण्याकरिता श्री. सिद्धिविनायक गणपती मंदिरात भेट देण्याचे आवाहन श्री. संदीप जोशी यांनी केले आहे.
पुंगनूर गायींचे वैशिष्ट्ये
दक्षिण भारतातील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर या गावाच्या नावावरून पुंगनूर बटू गायीच्या जातीचे नाव पडले. भारतीय संस्कृतीत वेद-उपनिशदांमध्ये या गायींचा उल्लेख आढळतो. या गायीच्या दुधात चरबीचे प्रमाण जास्त असते आणि ते औषधी गुणधर्मांनी समृद्ध असते. त्यामुळे या गायीला आयुर्वेदात विशेष महत्व आहे. पुंगनूर गाय कमी उंचीची, उच्च दूध उत्पादन क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे. पुंगनूर गायीची सरासरी उंची ७० ते ९० सेमी असते आणि वजन ११५ ते २०० किलोग्रॅमच्या दरम्यान असते. पुंगनूर गायी अवर्षण प्रतिरोधक आहेत. त्या कोरड्या चाऱ्यावर देखील जगू शकतात. या गायींची देहबोली ही हरणासारखी चपळ आहे. तिची चालण्याची शैली सुंदर आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















