
पुणे -राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी कामकाज सुरु आहे. परंतु मागासवर्गीय आयोग केवळ मराठाच नाही तर सर्व जातींचे सर्वेक्षण करणार आहे. संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण २० निकषांवर तपासले जाणार आहे. येत्या दोन, तीन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या अहवालानुसार राज्यातील सामाजिक आरक्षण ठरण्याची शक्यता आहे. (Survey Of Backward Classes Commission)
राज्य मागसवर्गीय आयोगाची बैठक पुणे येथे झाली. या बैठकीत सर्वच जातींचे मागासलेपण तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी राज्यातील प्रत्येक घराघरात सर्वेक्षण करण्यात येणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत हे काम सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले. संविधानातील तरतुदीनुसार सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक मागासलेपण २० निकषांवर तपासले जाणार आहे. येत्या दोन, तीन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. या अहवालानुसार राज्यातील सामाजिक आरक्षण ठरण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.