प्रतिनिधी भंडारा
शासकीय ,अशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी बांधवांना सन १९८१-१९८२ ची जुनी पेन्शन मिळत होती त्यामुळे सेवानिवृत्त झाल्यावर म्हातारपणात पेन्शन मोठा आधार होता परंतु माशी कुठे शिंकली कुणास ठाऊक १ नोव्हेंबर २००५ व त्यानंतर सेवेत
रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना बंद करून अंशादायी परिभाषित पेन्शन योजना कार्यान्वित करण्यात आली त्यामुळे कर्मचारी
सेवा निवृत्त झाल्यावर सदर योजनेचा पुरेशा लाभ मिळणार नसून नवीन अंशदायी परिभाषित पेन्शन योजने मुळे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार असून म्हातारपणात त्यांना दैनंदिन खर्च
कसा करावा, वितभर पोटाची खळगी कशी भरावी,उसने उधारी कशी द्यावी ,औषधोपचार कसा करावा या सारखे अनेक प्रश्न उद्दभवणार असून यामुळे त्यांची मानसिकता ढासळेल आणि शारीरिक ,मानसिक,भावनिक व आर्थिक त्रास सहन करावा
लागेल ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे.त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने १९८१-८२ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी यासाठी पेन्शन जनक्रांती मोर्चा संघटनेने सुरू केलेले सत्याग्रह हे न्यायिक असून नागपूर येथील सत्याग्रहात ओ बी सी क्रांती मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले असून पूर्ण पने जाहीर समर्थन असल्याची माहिती ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी दिली असून केंद्र व राज्य सरकारने जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणारा
धोरणात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी ओ बी सी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी केली आहे.
ओ बी सी क्रांती मोर्चाचे पेन्शन जनक्रांती मोर्चाला जाहीर समर्थन…संजय मते
Breaking news
MAHARASHTRA
MAHARASHTRA















