“अविरत आणि अंभृणी चा सार्वजनिक भारत माता पूजन सोहळा”

0

 

“अविरत” आणि “अंभृणी सेवा संस्था” या संस्थांच्या संयुक्त सहकार्याने दरवर्षी अंबाझरी लेआउट येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभ-पर्वा वर सार्वजनिक भारत माता पूजन केले जाते.

यावर्षी सकाळी साडे दहा वाजता डॉ. आशा बजाज आणि डॉ. राम बजाज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पार्पण करून आणि दीप प्रज्वलित करून भारत माता पूजन करण्यात आले. भारत माता की जय वंदे मातरम स्वातंत्र्य दिन चिरायू होवो या घोषनांच्या जल्लोषात सोहळा संपन्न झाला.

यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना खाऊचे पाकीट वाटप करण्यात आले.
अनेक क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्ती या सोहळ्यात स्वयं सामील झाल्या.

प्लास्टिक गोळा करणाऱ्या माता भगिनी, प्राध्यापक, इंजिनिअर, इ. सहभागी झालेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात डॉ. रत्नप्रभा अंजनगावकर, स्वधा लांजेवार, अंकित रामटेके, असिधारा लांजेवार,स्वप्निल बोहटे आणि ज्ञानेश्वर यांनी परिश्रम घेतले.