विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन

0
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन
protest-in-front-of-leader-of-opposition-vijay-wadettiwars-residence

चंद्रपूर बलात्कार प्रकरणानंतर काँग्रेस विरोधात भाजपा युवा मोर्चा आक्रमक

चंद्रपूर (Chandrapur) :- चंद्रपूर येथे सहावीतील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने आक्रमक पवित्रा घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानाबाहेर शुक्रवारी जोरदार आंदोलन केले. भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी ‘कांग्रेस का हाथ बलात्कारीयोंके साथ’ अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवा मोर्चा महामंत्री निखिल चव्हाण, भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष सुनील राणा, अमृत मारणे, सचिव तेजस्विनी कदम, अजित कुलथे, ओमकार चव्हाण आदी उपस्थित होते. युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षाने लांछनास्पद कृत्य केल्यानंतर माताभगीनींच्या सुरक्षेला आमचे प्राधान्य असे

म्हणणा-या काँग्रेसचा बुरखा टराटरा फाटला आहे. काँग्रेसने याबाबत भूमिका स्पष्ट करावी …लोंढे वर कारवाई करणार,की लोंढे याला पाठीशी घालण्याचे काम करणार असे सवालही आंदोलनावेळी करण्यात आले.

चंद्रपूर मधील कोरपना तालुक्यातील खासगी शाळेतील एका सहावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्या प्रकरणी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांना अटक करण्यात आली. लोंढे हा अकोला मार्गे मुंबई येथे पळून जात असताना अकोला बस स्थानकावर पोलिसांनी अटक केली.

कोरपना येथे पुण्याच्या एमिनेन्स इंग्लिश स्कूलची शाखा आहे. त्याच्या व्यवस्थापनाचे काम पाहाणारे कोरपना शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अमोल लोंढे यांनी पीडित विद्यार्थिनीला मे महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्टीत वर्गाबाहेर बोलावत कार्यालयामध्ये नेऊन दोन गोळ्या पाण्यासोबत खायला लावल्या. गोळी खाण्यास विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिला धमकवण्यात आले. घाबरलेल्या विद्यार्थिनीने गोळ्या खाल्ल्या. त्यानंतर अमोल लोंढे याने जबरदस्तीने बलात्कार केल्याची तक्रार विद्यार्थिनीने केली होती. घरी कोणाला सांगितल्यास वडिलांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. या घटनेनंतर पोलिस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते. मात्र पालक व शिक्षकांनी कोरपना पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोठावून संताप व्यक्त केल्यानंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Chandrapur wikipedia in marathi
Chandrapur in which district
Chandrapur distance
Chandrapur is famous for
Chandrapur in which state
Chandrapur history
Chandrapur area
Chandrapur map