(Amravti)अमरावती– जेष्ठ पत्रकार निखिल वागळे हे काल पुण्यात ‘निर्भय बनो’ या कार्यक्रमाला जात असताना निखिल वागळे यांच्या वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या व त्यांना कार्यक्रमास जाण्यास रोखण्याचा प्रयत्न झाला. एका प्रकारे पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हा जीवघेणा हल्ला असल्याचा आरोप अमरावतीमधील पत्रकारांनी केला. दरम्यान अमरावती येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने (Nikhil Wagle)निखिल वागळे यांच्या वरील हल्लाचा निषेध नोंदवला, यावेळी राज्य सरकारने तातडीने या घटनेची गंभीरपणे दखल घेऊन हल्लेखोरांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
Related posts:
भाजप महिला आघाडी मध्य नागपूर तर्फे महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन 30 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर...
October 30, 2025LOCAL NEWS
सड़क सुरक्षा को बढ़ावा देने के लिए ‘जनआक्रोश’ की ‘गांधीगीरी’
October 30, 2025LOCAL NEWS
नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘शिववैभव किल्ले स्पर्धे’चा भव्य शुभारंभ
October 30, 2025LOCAL NEWS
















