

राष्ट्रवादी ((श.प.) काँग्रेस पक्षातर्फे खाजगी शाळा विरोधात धरणे आंदोलन व जाहिर निषेद-राहुल देवतळे (Rahul Devtale)
राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) गटाचे जिल्हाशहर अध्यक्ष दिपक भाऊ जयस्वाल यांच्या मार्गदर्शनात आणि शहर जिल्हा उपाध्यक्ष राहुल देवतळे यांच्या नेतृत्वात खाजगी शाळा विरोधात चाललेल्या गैरव्यवहाराबाबत आणि पुस्तके गणवेश, नोटबुक व इतर साहित्य ठराविक दुकानामधुन खरेदी करा आणि हे साहित्य दुसरीकडे कुठे ही मिळणार नाही असे धोरण खाजगी शाळा धारकांनी आखलेले असुन सर्व सामान्य व पालकांची लुट होत असल्याचे दिसुन येत असून शिक्षण क्षेत्राला व्यवसायाचं रुप देणाऱ्या संस्थाना बंधन लागणे आवश्यक आहे.
यामध्ये सर्व सामान्यांना दुसरीकडे पर्याय नसुन जास्त दराने शालेय साहित्य ठराविक दुकानातुनच घ्यावे लागत आहे म्हणुन राहुल देवतळे यांनी मा. जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले असुन लवकरच चाललेला हा काळा बाजार थांबवावा व जनहितासाठी निर्णय घ्यावा करीता जाहिर निषेद व धरणे आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी महिला शहर अध्यक्ष शिल्पा कांबळे, जिल्हा शहर महासचिव सुहास पिंगे, सुधाकर कातकर, विनोद लभाने, संजय जिझीलवार, बब्बु इसा, वसंता पवार, प्रविण भांदक्कर, मनोज कोत्तेजवार, अमित दुरर्सेलवार, विपुल चहारे, परब गिरडकर, देविदास मामिडवार उपस्थित होते.