
नाशिक, २३ जुलै,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील टोलनाक्याची मोडतोड केल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली आहे. यामुळे चांगलीच खळबळ उडाली असून पोलीस याप्रकरणी गुन्हा दाखल करत आहेत.The incident of Maharashtra Navnirman Sena workers vandalizing the toll booth on Samriddhi Highway took place in the early hours of Sunday. This has created a lot of excitement and the police is registering a case in this matter.
याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, मनसेचे युवा नेते अमित ठाकरे हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती होते. त्यांनी जळगावकरचा दौरा करून सरळ समृद्धी महामार्गावरून मुंबईकडे जात असताना मध्यरात्री नंतर म्हणजे रविवारी पहाटेच्या सुमारास सर्वसाधारण दीड ते दोनच्या आसपास ते समृद्धी महामार्गावरील नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथील टोल नाक्यावरती आले असताना त्या ठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे टोल मागितला. त्यांनी कायदेशीर तो टोल दिला देखील आणि ते पुन्हा मुंबईकडे रवाना झाले.
दरम्यान, या घटनेची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते हे गोंदे टोलनाका येथे गेले आणि त्या ठिकाणी ते विचारपूस करत असताना गोंदे टोलनाकाच्या कर्मचाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांशी वाद घातले आणि अरे रावेची भाषा केली आणि संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी गोंदे टोलनाक्याची रविवारी पहाटेच्या सुमारास तोडफोड केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वाडीवरे व इगतपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत मनसे कार्यकर्ते तोडफोड करून हे निघून गेले होते. या घटनेमुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.