NDA च्या विरोधात विरोधकांची INDIA आघाडी

0

बंगळुरु-केंद्रातील मोदी सरकार व भाजपविरुद्ध एकत्र येण्यासाठी बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांच्या ऐक्याची दुसऱ्या दिवशीची बैठक सुरू असून या बैठकीत विरोधी पक्षांच्या आघाडीला INDIA असे नाव देण्यात आले आहे. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी विरोधी आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आल्याचे सांगितले. या नावाचा फुल फॉर्मही त्यांनी सांगितला. या नावाचा फुल फॉर्म “इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुसिव्ह अलायन्स” असे आहे.
काँग्रेसला सत्ता किंवा पंतप्रधानपदात रस नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुग खरगे म्हणाले. तर आपली राज्यघटना, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्याय यांचं रक्षण करण्याचा आमचा हेतू आहे, असेही ते म्हणाले. राज्य पातळीवर विरोधी पक्षांमध्ये मतभेद आहेत, मात्र हे मतभेद विचारधारेशी संबंधित नसल्याचेही खरगे म्हणाले. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधात 26 पक्ष एकत्र आले आहेत. दरम्यान, विरोधकांच्या या आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, असे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहेत.
काँग्रेस गोटातील माहितीनुसार सोनिया गांधी या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्या असून त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारही नाहीत. त्यामुळे त्यांना संयोजक करावे, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. 2024च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी संयोजक बनवले जाणार आहेत. कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणती भूमिका मांडायची, यासाठी स्वतंत्र गट तयार केले जातील आणि ते ठरवतील. विरोधकांच्या आघाडीसाठी किमान समान कार्यक्रमही निश्चित केला जाणार असल्याची माहिती आहे. सार्वत्रिक निवडणुका मोदी विरुद्ध विरोधी पक्षनेते अशी न करता त्याला मोदी विरुद्ध जनता असे स्वरूप द्यायला हवे, यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.काँग्रेस गोटातील माहितीनुसार सोनिया गांधी या सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्या असून त्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारही नाहीत. त्यामुळे त्यांना संयोजक करावे, असा काँग्रेसचा प्रस्ताव आहे. 2024च्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी संयोजक बनवले जाणार आहेत. कोणते मुद्दे मांडायचे आणि कोणती भूमिका मांडायची, यासाठी स्वतंत्र गट तयार केले जातील आणि ते ठरवतील. विरोधकांच्या आघाडीसाठी किमान समान कार्यक्रमही निश्चित केला जाणार असल्याची माहिती आहे. सार्वत्रिक निवडणुका मोदी विरुद्ध विरोधी पक्षनेते अशी न करता त्याला मोदी विरुद्ध जनता असे स्वरूप द्यायला हवे, यावरही बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.