

‘नाऽद विठ्ठल विठ्ठल!’ 16 जुलै रोजी
नागपूर(Nagpur), 12 जुलै : – सप्तक, नागपूरच्या वतीने आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारंपरिक अभंगांसोबत काही नवीन निवडक अभंगांचा कार्यक्रम ‘नाऽद विठ्ठल विठ्ठल!’ चे मंगळवार, 16 जुलै 2024 रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सायंटिफिक हॉल, आठ रस्ता चौक, लक्ष्मीनगर सायंकाळी 6.30 वाजता होणा-या या भक्तिमय स्वरधारेच्या कार्यक्रमात ख्यातनाम कवी महेंद्र पेंढरकर यांच्या नवीन अंभंगोना राष्ट्रपती पदक प्राप्त संगीतकार शैलेश दाणी यांनी स्वरसाज चढवला आहे. रत्नागिरीचे युवा गायक अजिंक्य पोंक्षे व मुंबईच्या गायिका केतकी चैतन्य यांच्यासोबत नागपूरचे यशस्वी कलावंत पांरपरिक व नवीन अभंग सादर करतील.
कार्यक्रमाचे निरुपण वृषाली देशपांडे करणार आहेत. या कार्यक्रमाला दिवाडकर्स अजित बेकरी, खासनीस प्राईम वेल्थ यांचे सहकार्य लाभत आहेत. हा कार्यक्रम नि:शुल्क असून निमंत्रित व सप्तक सदस्यांसाठी आहे.