
सप्तकतर्फे 20 एप्रिल रोजी आयोजन
नागपूर (Nagpur), 16 एप्रिल
सप्तक नागपूर प्रस्तुत फिल्मी, गैरफिल्मी कव्वाली, गझल गीत आणि शायरीचा कार्यक्रम रविवार, 20 एप्रिल रोजी पर्सिस्टंट सिस्टिम येथील कवी कुलगुरू कालिदास सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार आशिष मुजुमदार यांनी केले असून झी सारेगामा फेम उज्ज्वल गजभोर, सूर नवा ध्यास नवा फेम रश्मी मोघे यांचा यात सहभाग राहणार आहे.
कार्यक्रमाचे निवेदन डॉ. समीरा गुजर-जोशी आणि समीर सामंत करणार आहेत. या मैफलीत सुप्रसिद्ध गायक नुसरत फतेह अली आणि इतर महान गायकांच्या कव्वाली, शायरी प्रस्तुत करण्यात येणार आहे. प्रसाद जोशी, आमोद कुलकर्णी, विक्रम जोशी, निनाद सोलापूरकर, राधिका अंतूरकर व आशिष मुजुमदार गायकांना वाद्यसंगत करतील. सर्व कलावंत पुण्याचे आहेत. हा कार्यक्रम फक्त सप्तक सभासदांकरिता आहे.