
पुण्यतिथीनिमित्त प्रो. राजेंद्र सिंग यांना आदरांजली
नागपूर(Nagpur) 14 जुलै :- प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्स्प्लोरेटरीतर्फे प्रो. राजेंद्र सिंग उपाख्य रज्जुभैय्या यांना 21 व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. रविवारी तारकुंडे धरमपेठ हायस्कूल परिसरातील सायन्स एक्स्प्लोरेटरीमध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रो. राजेंद्र सिंग यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रो. राजेंद्र सिंग सायन्स एक्स्प्लोरेटरीचे अध्यक्ष हेमंत चाफले, विश्व हिंदू परिषदेचे ज्येष्ठ सदस्य डॉ. हेमंत जांभेकर, सल्लागार समितीचे सदस्य श्रीकांत पाठक, डॉ. सरोज देसाई, डॉ. भारती गाणू, सायन्स एक्स्प्लोरेटरीच्या संचालक डॉ. सीमा उबाळे, विद्यार्थी आणि एक्स्प्लोरेटरीचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. यानिमित्ताने रज्जुभैय्यांच्या जीवनावर आधारित व्हिडिओ मेकिंग स्पर्धा घेण्यात आली. अर्णव कांबळे या विद्यार्थ्याने या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.
















